प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना,असा करा अर्ज.
Kusum solar pump yojana maharashtra 2023– राज्यात कुसुम सोलर पंप योजना सुरू.कुसुम सोलर पंप ( kusum solar pump yojana maharashtra ) योजनेतर्गत पुढील 5 वर्षात 5 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास तर त्यापैकी 2021 या वर्षासाठी मंजूर १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे
![]() |
| प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना,असा करा अर्ज. |
kusum solar pump yojana
राज्य शासना कडून जाहीर करण्यात आलेल्या ऊर्जा धोरण २०२० नुसार शेतीला दिवसा वीज देण्याच उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दृष्टीने या धोरणाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या धोरणातून पुढील पाच वर्षात दरवर्षी 1 लाख याप्रमाणे 5 लाख सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत तर ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी 10 हजार घरांना सौरउर्जेद्वारे वीजपुरवठा करणे प्रस्तावित आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी पंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलीआहे. ज्यात केंद्र शासनाच्या कुसुम सोलर पंप ( Pm kusum solar ) योजनेअंतर्गत या महाअभियानाची अंमलबजावणी करण्यात येऊन राज्यात एक लाख सौर पंप ( solar pump ) उभारण्यात येतील.
राज्य शासनाच्या माध्यमातून एक लाख सौर पंप ( solar pump ) उभारण्यासाठी 1969.50 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून यातील 30 % म्हणजे 585 कोटी केंद्राकडून तर 173 कोटी लाभार्थींकडून उपलब्ध होणार आहे. यातील उर्वरित 1211 कोटी इतका निधी राज्य शासन देणार आहे. यामुळे पुढील 5 वर्षात प्रत्येकी 436 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद व 775 कोटी अतिरिक्त वीज विक्री कर यामार्फत निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली.
राज्यात कुसुम सोलर पंप योजना ( kusum solar pump yojana maharashtra ) या योजनेची अंमलबजावणी महाऊर्जामार्फत होत आहे.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय,नवी दिल्ली यांचे कडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थाण महाभियान ( PM KUSUM कुसुम ) राज्यात तीन घटकांतर्गत राबविण्यात येणार आहे.
SC आणि ST साठी 9%राखीव कोटा ठेवण्यात आला आहे आणि बाकीचा जो उरलेला उरलेला कोठे आहे तो ओपन वाल्यांसाठी ठेवला आहे
लागणारी कागदपत्रं kusum solar Documents
1)७/१२ उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
2)आधारकार्ड प्रत.
3)रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत,
4)पासपोर्ट आकाराचा फोटो,
5)शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र ही सादर करावे लागेल.
6)photo
how to apply for kusum solar
अर्ज भरण्यासाठी पात्र असलेल्या सेफ व्हिलेज ची लिस्ट GSDA कडून देण्यात आली आहे, या लिस्ट मध्ये नाव असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना यात अर्ज करता येतील, मात्र जरी लिस्ट मध्ये गावाचे नाव नसेल तरी आपण अर्ज करू शकता त्यासाठी आपण सिंचनासाठी डिझेल पंप वापरत आहे या ऑपशन मध्ये होय वरती क्लिक करून अर्ज भरु शकता.
जर तुमच्या गावाचे गाव जिल्ह्याचे व गावाचे नाव असेल तर तुम्ही हा अर्ज भरण्यासाठी mahaurja.com या वेबसाईटला भेट द्या
अर्ज पूर्ण भरल्यावर आपणास कोटेशन दिले जाईल त्यानुसार पैसे ७ दिवसाच्या आत मध्ये भरावे लागतील अन्यथा ते अपात्र ठरवले जाईल
बँक डिटेल देणे महत्वाचे आहे जेणे करून अर्ज बाद झाल्यास केलेला भरणा खात्यात जमा होईल.
अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला भेट देत जा.
प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना

0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाच्या संबंधित नाही कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून म्हणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतेही वैयक्तिक माहिती देऊ नये. ही एक प्रायव्हेट वेबसाईट आहे.