मुसळधार पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

 मुसळधार पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले महत्वपूर्ण निर्णय

मुसळधार पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
मुसळधार पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई


राज्यात सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होते. मात्र, सततच्या पावसाची कोणतीही परिभाषा नसल्यामुळे ती निश्चित करण्यासाठी आणि शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळण्यासाठी निकष निश्चित करण्यासाठी कृषी विभागाची समिती नियुक्त केली होती. या समितीने शेती पिकांच्या नुकसानीकरिता विहित दराने मदत देण्याकरिता सततच्या पावसासाठी काही निकष सुचविले होते. त्याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय सरकारने घेतला आहे.


मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.


पंचनाम्यासाठी मोबाईल App वापर

नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.


किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील मदत

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशाप्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. झालेल्या पावसाचे व इतर हवामान विषयक बाबीचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील. पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीला सूचना देण्यात येतात. तसेच कृषि कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना/अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील.नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.


शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, केंद्राच्या योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी सुनियोजित पध्दतीने कार्य केले जाईल. “अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिट सक्षम करुन जलद गतीने दिशा देण्याचे काम केले जाईल. जैविक शेती व नैसर्गिक शेतीसंदर्भात केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील जेणेकरुन आपली शेती विषमुक्त होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेत शिवार ते बाजारपेठेपर्यंत असणारी संपूर्ण दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले जाईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर केले जाईल. असेही श्री.शिंदे म्हणाले.


राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘अतिवृष्टी’ या नैसर्गिक आपत्तीसाठी देखील 24 तासामध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवण्यात आला आहे. त्याचप्राणे सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या ट्रीगरमधील ‘सामान्यकृत वनस्पती निर्देशांक’ हा अतिरिक्त निकष आता शेती पिकांच्या नुकसानीकरिता आणि दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी देखील हा निकष आता लागू रहाणार आहे.

अतिवृष्टीमुळे काय होते?


अतिवृष्टीमुळे असंख्य धोके होऊ शकतात, उदाहरणार्थ: पूर, मानवी जीवनाला धोका, इमारती आणि पायाभूत सुविधांचे नुकसान आणि पिके आणि पशुधनाचे नुकसान. भूस्खलन, ज्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो, वाहतूक आणि दळणवळण विस्कळीत होऊ शकते आणि इमारती आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होऊ शकते.

मुसळधार पावसाचा संदेश काय आहे?


डायरेक्टर डेव्हिड केजने हेवी रेनचे वर्णन कोणत्याही अलौकिक घटकांशिवाय "परिपक्व थीमसह अतिशय गडद फिल्म नॉइर" असे केले आणि "[खेळाचा] खरा संदेश हा आहे की तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला वाचवण्यासाठी किती दूर जाण्यास तयार आहात ."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या